जालना: सलग 3 दिवस भगरीतून विषबाधा; भक्तांमध्ये खळबळ

जालन्यातील वडीगोद्री गावात भगर खाल्ल्याने सलग ३ दिवसांपासून १४ रूग्णांना विषबाधा झाली आहे.
जालना: सलग 3 दिवस भगरीतून विषबाधा; भक्तांमध्ये खळबळ
जालना: सलग 3 दिवस भगरीतून विषबाधा; भक्तांमध्ये खळबळलक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील Jalna वडीगोद्री गावात भगर खाल्ल्याने सलग ३ दिवसांपासून १४ रूग्णांना विषबाधा झाली आहे. यातील १२ रुग्णांना आतापर्यंत दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असून दोन रुग्णांवर अजूनही खाजगी रुग्णालयात Private Hospital Jalna उपचार सुरु आहेत.

हे देखील पहा-

ता. ७, ६ आणि आज पुन्हा एका रुग्णाला भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्यानं नवरात्रीत उपवास धरणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी भगर खाल्ल्याने ४५ वर्षीय सौमित्रा काळे या महिलेला विषबाधा झाली असून त्यांच्यावर वडीगोद्रीतील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जालना: सलग 3 दिवस भगरीतून विषबाधा; भक्तांमध्ये खळबळ
IT Raid: आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.भगरीतून सतत विषबाधा होत असल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन किराणा दुकानांमधून ३८ किलो भगर जप्त केली आहे. या भगरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.