Samruddhi Mahamarg Accident: कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झाला भयंकर अपघात; 2 जण जखमी

Jalna News: समृद्धी महामार्गावरील काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Accident News
Accident NewsSaam Tv

Jalna Accident News: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकीकडे परिवहन विभागाने महामार्गावरील अपघात कमी करण्याची गांधीगिरी सुरू केली असताना दुसरीकडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एका कारचा भीषण अपघात झाला आहे. (Latest Marathi news)

Accident News
Viral Video: अरे बापरे! कॅमेऱ्यात कैद झाली रहस्यमय घटना, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले थक्क

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) कुत्रा मध्ये आल्याने एका कारचा अपघात झाल्याची झाला आहे. काल मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जखमी गंभीर जखमी झाले असून. पोलिसांनी (Police) जखमींना उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.(Breaking Marathi News)

हे दोन्ही प्रवाशी गोंदिया कडून संभाजीनगरच्या दिशेने मध्यरात्री एक वाजल्याच्या सुमारास जातं असताना जालन्यातील (Jalna) समृद्धी महामार्गांवर हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या महामार्गावर कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याने हा महामार्ग सुरक्षाच्या दृष्ठिनी असुरक्षित असल्याची भावना आता प्रवशी वर्गातून व्यक्त केल्या जातं आहे.

Accident News
Barsu Refinery Project News : बारसू रिफायनरीच्या आंदाेलक महिलांना उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात हलवलं

टायर फुटून भीषण अपघात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी टायर फुटून आणखी अपघात झाला होता. नाशिकहून (Nashik) यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा समोरील टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला होता.टायर फुटला तेव्हा गाडीमध्ये चार जण प्रवास करीत होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चौघेही किरकोळ जखमी झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com