रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला गती, विमानाद्वारे होणार सर्वे

हे विमान एका दिवसाला ५० किलोमीटरचा सर्वे करणार
Jalna News
Jalna Newsलक्ष्मण सोळुंखे

जालना: रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना (Jalna) जळगाव रेल्वे (railway) मार्गाचा "फायनल लोकेशन सर्वे" (Final location survey) केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ८ फेब्रुवारी २०२२ दिवशी मंजूर केला होता. जालना ते जळगाव जिल्ह्यातील (district) लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव १७४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्वेचे काम भौतिकदृष्ट्या सुरुच आहे. त्यासोबतच आता हवाई सर्वे करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला (Akola) येथे विमान ही दाखल झाले असून या विमानाद्वारे रडारचा वापर करुन हवाई सर्वे केला जाणार आहे.

हे देखील पहा-

हे विमान एका दिवसाला ५० किलोमीटरचा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेला गती मिळणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. १४ ते १७ मे अशा चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण केल्या जाणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या सर्वेसाठी ४.५ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. फायनल लोकेशन सर्वे झाल्यानंतर हा सर्वे स्विकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. त्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळणार असल्याचे ही दानवे यांनी यावेळी सांगितले आहे.

Jalna News
बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन

जालना जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालनावरुन पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा ७०% मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पुर्ण होणार आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com