Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

राज्यभरातील आठ संघटना एकत्रित झाल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
jalna, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
jalna, maharashtra legislative council graduate and teachers constituency electionsaam tv

Maharashtra News : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यात आगामी काळात हाेणा-या शिक्षक व पदवीधर निवडणुकीवर (maharashtra legislative council graduate and teachers constituency election) जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. त्याबाबत जालना (jalna) येथे समितीने नुकतेच जिल्हा प्रशासनास निवेदन दिले आहे.

jalna, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
दीडशे फुटांपर्यंत खेचत नेले..., कार 360 डिग्री फिरल्यानंतर समाेर दरी..., अपघाताचा थरार सांगताहेत कदम (पाहा व्हिडिओ)

जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीचे समन्वयक गजानन वाळके म्हणाले शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने (28 डिसेंबर 2022) या काालवधीत एक अधिसूचना काढली आहे. यामध्ये राज्यातील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती व मर्यादीत विभागीय परीक्षेसाठीची संधी हिरावून घेतली आहे.

jalna, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
Maharashtra Politics: 'शिंदे - फडणवीसांना आमची किंमत नाही'; बच्चू कडूंची उघड नाराजी (पाहा व्हिडिओ)

ही अधिसूचना रद्द करावी आणि आम्हांला न्याय द्यावा याबाबतचे आम्ही प्रशासनास निवदेन दिले आहे. चाळके म्हणाले ही अधिसूचना रद्द न झाल्यास आम्ही आगामी पदवीधर निवडणुकीवर (election) बहिष्कार घालू. शासन आमच्यावर ही वेळ येऊ देणार याची खात्री असल्याचे चाळके यांनी नमूद केले. (Maharashtra News)

jalna, maharashtra legislative council graduate and teachers constituency election
Education Officer : शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड ! प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेवर 420 चा गुन्हा दाखल

चाळके यांनी या बहिष्कारात राज्यभरातील आठ संघटना एकत्रित झाल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले राज्यातील बत्तीस हजार शिक्षक आमच्या समवेत आहेत. शासनावर आम्ही माेठा दबाव आणणार आहाेत असे चाळके यांनी ठणावून सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com