जालन्यातील पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला

जिल्ह्यातील धामना, जुई, जीवरेखा, गलाटी, निम्न दुधना, खडकपूर्णा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
जालन्यातील पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
जालन्यातील पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलालक्ष्मण सोळुंखे

जालना : जालना शहरासह (Jalna City) ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा करणारा घाणेवाडी तलावासह जिल्ह्यातील धामना, जुई, जीवरेखा, गलाटी, निम्न दुधना, खडकपूर्णा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे, गेल्या दोन दिवसांपासून प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने हे प्रकल्प पुर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहेत. (Jalna water project overflow)

हे देखील पहा -

सर्वच धरणे पुर्ण भरल्यामुळे जालना शहरासह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पाची ही स्थिती असल्याने सिंचनाचा प्रश्न ही मार्गी लागला आहे.

जालन्यातील पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
Rain Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 157.97% टक्के इतका म्हणजेच 952.70 मी.मी.पाऊस पडला असल्याने अनेक भागात खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय,तर जिल्ह्यातील प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने रब्बीच्या पिकांना यांचा मोठा फायदा होणार असल्याचं जाणकार सांगत आहेत तर जिह्यातील प्रकल्प पूर्णपणे ओसंडून वाहू लागल्यानं नागरीकांह शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Editd By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com