ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संपेना! 10 तारीख आली बँक खातं रिकामच

वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे पण या महिन्यात सुद्धा १० तारीख रोजी सुद्धा वेतन मिळालेले नाही.
ST Bus
ST BusSaam Tv

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्य त्रि सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते.

पण या महिन्याची १० तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे. सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.  (Latest Marathi News)

ST Bus
Ravi Rana Vs Nitin Deshmukh: बायकोच्या जीवावर राजकारण; देशमुखांच्या टोमण्याला राणांचं उत्तर; म्हणाले, पापाचा घडा भरलाय!

वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे पण या महिन्यात सुद्धा १० तारीख रोजी सुद्धा वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विरोधी पक्षात असताना संपात कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलणारे भाजप नेते आता सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत.

भाजपाची संप काळातील भूमिका व आताची भूमिका पाहिली तर भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. संप काळात संप चिघळला जावा यासाठी फुकट अन्न धान्य पुरवणारे आता कष्टाचा महिन्याचा पगार वेळेवर द्यायला तयार नाहीत.ही लबाडी असून लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. इतर सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

ST Bus
Jayant Patil News: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' कणखर भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा'; जयंत पाटील यांचं ट्विट चर्चेत

भाजपा नेते संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडत सातवा वेतन आयोग मिळाला ही पाहिजे, विलीनीकरण झाले पाहिजे. वेतन वेळेवर मिळाले पाहिजे असे वारंवार बोलत होते.पण आता या विषयावर बोलायला तयार नाहीत.हे आता फार काळ सहन केले जाणार नाही.शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून कामगार कामगारांची पीएफ, ग्र्याज्यूटी, बँक कर्ज व इतर मिळून 1200 कोटी रुपयांची रक्कम थकली असून वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत सापडल्या आहेत असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com