जळगावात सुषमा अंधारेंच्या सभेआधीच राजकारण तापलं; ठाकरे गटाचे २५ कार्यकर्ते अटकेत

जळगावात मुक्ताईनगर महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांच्या सभेवरून आधीच वातावारण तापलं आहे.
sushma andhare
sushma andhare saam tv

Jalgaon Political News : जळगावात मुक्ताईनगर महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांच्या सभेवरून आधीच वातावारण तापलं आहे. ठाकरे गटाच्या या सभेवरून जळगावात जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलेलं पाहायला मिळत आहे. सभेचा स्टेज पोलिसांनी काढून घेतला होता. त्यानंतरही आता सभेसाठी आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे गट सेनेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

sushma andhare
Praful Patel : राज्य सरकारचे भवितव्य उज्वल वाटत नाही, प्रफुल्ल पटेलांचा टोला

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभेला मुक्ताई नगर येथे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही आज मुक्ताई नगर येथे सभा घेण्यास आग्रह धरणाऱ्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त मुक्ताईनगर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी सभेसाठी आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

sushma andhare
शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची नाराजी दूर होणार; हिवाळी अधिवेशनाच्या आधीच 'या' मोठ्या निर्णयाची शक्यता

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अटक केल्यामुळे आता मुक्ताईनगरला वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळे जळगावात तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.

मात्र, या सर्व घडामोडीनंतरही मुक्ताईनगर येथील नियोजित सुषमा अंधारे यांची सभा ही होणारच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून केला जात आहे. नेमका आता प्रशासन काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर साम टीव्हीला फॉलो करा. त्याच सोबत यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com