टोकियो स्पर्धेसाठी सुयश जाधवला जयंत पाटीलांनी दिल्या  शुभेच्छा
टोकियो स्पर्धेसाठी सुयश जाधवला जयंत पाटीलांनी दिल्या शुभेच्छाsaam tv

टोकियो स्पर्धेसाठी सुयश जाधवला जयंत पाटीलांनी दिल्या शुभेच्छा

अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला शुभेच्छा द्याव्यात, असं मला मनापासून वाटलं.

सोलापुर : सोलापूरातील (Solapur) करमाळा तालुक्यातून येणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू (Disabled swimmers) सुयश जाधवशी (Suyash Jadhav) राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. सुयश यंदाच्या टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ (Tokyo Paralympics 2021) स्पर्धेसाठी भारताच्या वतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून मला समजले. अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला शुभेच्छा द्याव्यात, असं मला मनापासून वाटलं. (Jayant Patil congratulated Suyash Jadhav for the Tokyo tournament)

टोकियो स्पर्धेसाठी सुयश जाधवला जयंत पाटीलांनी दिल्या  शुभेच्छा
नंदुरबारमध्ये अडीच हजाराहुन आधिक बालके तीव्र कुपोषित

सुयशने २०१६ साली झालेल्या रियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. २०१८ साली सुयशला महाराष्ट्र शासनाचा मानाचा एकलव्य पुरस्कार तर २०२० साली भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देखील देण्यात आला. जागतिक पातळीवर सुयश यांनी आतापर्यंत १२३ मेडल्स मिळवले आहेत. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद आहे.

जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अपंग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही, अशी खंत सुयशने बोलून दाखवली. आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे त्याचा योग्य सन्मान केला जाईल, असे सर्वांच्या वतीने मी त्याला आश्वासित केले आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com