
सांगली: देशात मोदी सरकारच्या अपयशामुळे महागाई जाणवत आहे. मध्यमवर्गीय, गोरगरीब माणसे महागाईत होळपळत आहेत. धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपा अफूची गोळी महागाई पासून विचलित करण्यासाठी वापरली जात आहे, यासाठी काही भुजगावण्यांचा वापर सुरू आहे. कितीही वेळा लक्ष विचलित केले तरी महागाईची चिंता जनतेला आहे. जनतेमधील नाराजी दडवण्यासाठी राजकीय भोंगे वाजवण्याचे काम केले जाते आहे अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. (Jayant Patil Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बाबरी पाडायला गेले असतील तर त्यांचे आताचे वय आणि त्यावेळचे वय काय असेल. फडणवीस यांच्याशी माझी घट्ट मैत्री आहे. त्यांनी बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे कधीही सांगितले नाही. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी बाबरीच्या सहभागाची माहिती घेईन. फडणवीस यांनी मला सर्व माहिती सांगावी. मी सुद्धा त्यांना खासगीत विचारणार आहे. शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली होती. तशी जबाबदारी फडणवीस घेणार का? असा प्रश्न विचारत जयंत पाटलांनी (Jayant Patil) फडणवीसांना चिमटा काढला आहे.
मनसेकडून तसं काही होईल असे वाटत नाही. झालं तर महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल. तरुणांचे करियर खराब करण्याचे काम कोणी करू नये. घोषणा करणारे चिथावणी देणारे करत असतात. मात्र तरुण रस्त्यावर उतरून आपले करिअर खराब करतात. कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये सुप्रीम कोर्टाच्या डेसीबलची मर्यादा कोणी पाळली नाही तर कारवाई होणार असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या जोतिषाची चौकशी करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी हे एक शक्ती स्थळ आहे. त्याला हरवण्याचे उद्दिष्ट काही लोकांचे भविष्यात आहे असेही पाटील म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.