जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना उपचाराची गरज : आ.दळवी
जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना उपचाराची गरज : आ.दळवीराजेश भोस्तेकर

जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना उपचाराची गरज : आ.दळवी

शेकाप आमदार जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना उपचाराची गरज असल्याची जोरदार टीका शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

रायगड : शेकाप आमदार जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना उपचाराची गरज असल्याची जोरदार टीका शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. मुरुड तालुक्यातील विहुर येथील एका जागेच्या व्यवहाराबाबत आमदार जयंत पाटील यांनी महेंद्र दळवी यांना भूमाफिया आणि गुंड बोलून त्याच्यावर टीका केली आहे. त्यास प्रत्युत्तर आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग सुमन क्रियेशन येथे पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

हे देखील पहा -

जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून विहुर येथील जागा गुरुचरण असेल तर ग्रामस्थांना ती परत मिळवून देणार असे आश्वासनही दिले आहे. तर कोरोना काळात आमदार जयंत पाटील यांनी निधी कुठे खर्च केला असा सवालही दळवी यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील दोन आमदारांच्या या शाब्दिक चकमकीबाबत सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. मुरुड तालुक्यातील विहुर येथील जागा ही नवाब कालीन आहे. ही जागा एका व्यवसायिकाला कायदेशीर प्रक्रिया करून विकण्यात आली आहे. मात्र, ही जागा गुरुचरण असल्याचा दावा आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना उपचाराची गरज : आ.दळवी
Shocking : सर्पदंश झाल्याने सक्ख्या बहीण भावाचा मृत्यू!

आमदार महेंद्र दळवी हे भूमाफिया असून गुंड प्रवृत्तीचे आहेत अशी टीका जयंत पाटील यांनी केला आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. कोरोना काळात आमदार निधी हा आरोग्यासाठी देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, आमदार जयंत पाटील यांनी कोव्हिड सेंटरला दिलेल्या निधीमधूनही स्वतःचा फायदा केला आहे. नक्की निधी दिला कुठे असा सवालही आमदार दळवी यांनी उपस्थित केला आहे. आरडीसीसी बँकेबाबतही माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत पाऊल उचलणार असल्याचे दळवी यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com