Jayant Patil ED Notice: जयंत पाटील आज ईडी कार्यालयात होणार हजर; कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात

'हवालदार हमसे डरता है ईडी को आगे करता है' अशा स्वरूपाच्या घोषणाबाजी केली जात आहे.
Jayant Patil
Jayant PatilSaam tv

निवृत्ती बाबर

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे. जयंत पाटील चौकशीला हजर राहताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Jayant Patil ED Notice News)

कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली आहे.

Jayant Patil
Beed Political News: ठाकरे गटाच्या वादात शिंदे गटाची उडी; सुषमा अंधारे यांना त्यांच्या विभक्त पतीनेच दिला इशारा, म्हणाले...

'हवालदार हमसे डरता है ईडी को आगे करता है' अशा स्वरूपाच्या घोषणाबाजी केली जात आहे. ईडी (ED) आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी होत आहे.

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Jayant Patil
Ajit Pawar On Jayant Patil : "ईडी समन्सबाबत जयंत पाटलांशी चर्चा नाही" अजित पवार यांची प्रतिक्रिया!

दरम्यान यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आव्हान केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे."

ED कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त...

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक असल्याने ED कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 300 हून अधिक पोलिस, SRPF तसेच दोन पोलिस उपायुक्त 1 अप्पर पोलिस आयुक्त ED कार्यालयाच्या बाहेर बंदोबस्तासाठी आहेत. Ed कार्यालयाच्या बाहेर चारी बाजुला बॅरीगेटिंग करण्यात आलं आहे. परिसरात नागरिकांना आणि वाहनांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com