मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या 'त्या' पत्राच जयंत पाटलांकडून समर्थन

अशोक चव्हाण यांनीच चार सदस्य पद्धत असावी असे मत मांडले होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या 'त्या' पत्राच जयंत पाटलांकडून समर्थन
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या 'त्या' पत्राच जयंत पाटलांकडून समर्थनSaam TV

परभणी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना (Governo) लिहिलेल्या पत्राच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Pati) यांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका वाजवी आहे. मुळात बलात्कार हे देशात सर्वत्र होतात आणि ही दुर्दैवाची बाब आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा पत्र लिहण्या मागचा उद्देश हा देशपातळीवर केंद्रानं बलात्कारा विषयी कडक कायदा करावा असा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच ते पत्र योग्यच असल्याच वक्तव्य जयंत पाटलांनी परभणीमध्ये केलं आहे. (Jayant Patil's support 'that' letter written by the CM to the Governor)

महाविकास आघाडी (MVA) येणाऱ्या पालिका महानगरपालिका (Municipal Corporation) एकत्र लढवव्यात ही राष्ट्रवादीची (NCP) भूमिका असून कोरोना काळात नेत्यांना प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही असही ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच राज्यभर झालेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली असून जो पर्यत पाऊस थांबत नाही तो पर्यत रस्ते दुरुस्त होणार नाहीत रस्त्यावर पड्लेल्या खड्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल असही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं आहे.

मेहबूब शेख (Mehboob Sheikh Matter) प्रकरणावरती बोलताना पाटील म्हणाले कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया द्यायची नसते. मात्र या प्रकरणाचा योग्य तपास पोलिस करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते तपासावर दबाव आणत नसल्याच सांगत त्यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपाचं खंडणही केलं.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या 'त्या' पत्राच जयंत पाटलांकडून समर्थन
अखेर शाळा सुरु होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती (पहा व्हिडीओ)

केंद्र सरकार ओबीसींचा डेटा देत नाही.

ओबीसी (OBC) प्रकरणावरती बोलताना जयंत पाटील म्हणाले मागच्या राज्य सरकारने कोर्टात डेटा देवू यासाठी पंधरा दिवस आणि एक महिना मागितला मात्र केंद्र सरकार कडून डेटा काही मिळाला नाही.

4 सदस्यीय पद्धतीची मागणी अशोक चव्हाणांची

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्य पद्धत लागू झाल्याने कॉंग्रेस नाराज आहे विचारले असता वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळी मत असतात त्यांच जास्त मनावर घ्यायचं नसतं आणि अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनीच चार सदस्य पद्धत असावी असे मत मांडले होते असा खुलासा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com