Pankaja Munde News: पंकजा मुंडेंची भाजपमधील नाराजी कायम? क्षीरसागरांसोबत भेटीनंतर चर्चांना उधाण

पंकजा मुंडे यांनी अवघ्या काही क्षणातच काढता पाय घेत जाणं पसंत केलं.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSaam TV

Beed News : बीड जिल्ह्यातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ .भारतभूषण क्षीरसागर यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतलीय. मात्र पंकजा मुंडे यांनी अवघ्या काही क्षणातच काढता पाय घेत जाणं पसंत केलं. यामुळे राजकीय वर्तुळात क्षीरसागरांसोबत न घेतलेल्या चहाची चर्चा चांगलीच रंगली आहे. (Maharashtra Political News)

Pankaja Munde News
Wardha News: धीरेंद्र महाराजांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन; संत तुकाराम महाराजाबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

बीड (Beed) जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघातील सर्व बूथवर जयदत्त क्षीरसागर यांची यंत्रणा तळ ठोकून आहे. बीड शहरातील चंपावती बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलेले माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षिरसागर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बूथ केंद्रावरच भेट घेतली.

यावेळी पंकजा मुंडे यांनी क्षीरसागर येतात काढता पाय घेतला. त्या अगोदर पंकजा मुंडे कार्यकर्त्याच्या आग्रहाचा चहा पिण्यासाठी बुथवर थांबल्या होत्या. मात्र, क्षीरसागर दाखल होताच पंकजा मुंडे चहा टाळून निघाल्या. (Latest Marathi News)

Pankaja Munde News
Chitra Wagh News : आधी तुलना मग स्पष्टीकरण; चित्रा वाघ म्हणाल्या, त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही...

त्यावेळी कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या पंकजा मुंडेंच्या हातात चहा दिला, अन गाडीत बसून चहा पीत पंकजा म्हणून निघून गेल्या. डॉ.भारतभूषण क्षीरसागर आल्यामुळे पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेत गाडीमध्ये चहा घेणं पसंत केलं ?

यावरून पंकजा मुंडे या क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे चहा घेत गाडीमध्ये बसून पुढे निघून गेल्या तर माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी पेंडॉलमध्ये बसून चहा घेतला, त्यामुळं या चहाची चर्चा चवीनं होत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com