उत्तर प्रदेशात महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार...; जितेंद्र आव्हाडांची CM योगी आदित्यनाथ यांच्यावर आगपाखड

आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत ह्या विचारांना विरोध करू, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV

Maharashtra Politics: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे, असं सांगतात. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या विचाराने पुन्हा एकदा अस्पृश्यता जन्माला येईल, असा घणाघात आव्हाडांनी केला आहे. (Latest Maharashtra Politics News)

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

"योगी आदित्यनाथ सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे असं म्हणतात.पण गाई आणि ब्राह्मणांना संरक्षण देणे एवढंच त्यांच्या 'सनातन धर्माचे'धोरण आहे! महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्यांक आणि दलितांवरील अत्याचारातील गुन्ह्यात त्यांचा नंबर १ आहे, तर अल्पवयीन मुलांवरील अत्याचारात ते नंबर २ वर आहेत", अशा तिखट शब्दांत आव्हाडांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पुढे ते म्हणाले की, " हेच त्यांचे आपल्या देशाविषयीचे विचार!देश जिथे अल्पसंख्यांक, इतर मागास वर्ग,दलित आणि वंचित मुलं महिलांच्या सुरक्षेपक्षा गाई आणि ब्राह्मणांची सुरक्षा त्यांना अधिक महत्त्वाची वाटते."

"सनातन धर्म म्हणजे स्पष्टपणाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा निर्माण आणि या व्यवस्थेला धुडकावणारा महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.समाजसुधारकांनी सर्वात जास्त विरोध केला तो सनातन धर्म आणि त्यातून निर्माण झालेल्या वर्णव्यवस्थेला." असं आव्हाडं म्हणाले.

Maharashtra Politics
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी पैशांचा वापर सुरू; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

योगी आदित्यनाथ स्पष्टपणाने सांगत आहेत की, " तोच खरा धर्म आहे आणि तो त्या देशाचा धर्म आहे ज्या धर्माला सगळ्या संतांनी नाकारलं,ज्या धर्माला शिवाजी महाराजांनी नाकारलं, ज्या धर्माला संभाजी महाराजांनी नाकारलं. नंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरांनी फेकून दिलं. तो धर्म पुन्हा भारतावर लादण्याची भाषा आता योगी आदित्यनाथ करीत आहेत. या धर्मामध्ये अलुतेदार, बलुतेदार म्हणजेच आजचे बहुजन यांना स्थानच नाही. म्हणजे परत एकदा गावाच्या बाहेर वस्त्या बसतील आणि परत एकदा अस्पृश्यता जन्माला येईल. यांच्या मनात काय आहे हे आता हळुहळु उघड व्हायला लागलं आहे. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत ह्या विचारांना विरोध करू, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com