
डोबिंवली : शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता . मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेचा प्रस्तावाला नकार दिला. त्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंनी छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला. संभाजीराजेंच्या (Sambhaji raje Chhatrapati) आरोपांवर छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेला नाही,अशी प्रतिक्रिया शाहू महाराज छत्रपती यांनी दिली होती. छत्रपती पिता-पुत्रांच्या संवादावर जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) भाष्य केलं आहे . (Jitendra Awhad Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
संभाजीराजे यांनी शिवसेनेवर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावर शाहू महाराज छत्रपती यांनी संभाराजेंना खडेबोल सुनावले होते. वडिलांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना संभाजीराजे ट्विट करत प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही'. पिता-पुत्रांच्या संवादावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाहू महाराज नावातच सगळं आलं , अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी पिता-पुत्रांच्या संवादावर भाष्य केलं आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी आर्यन खानच्या मुक्ततेवरही प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. एखाद्या बालमनावर चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या घरच्या मुलाकडे बघून आपण विचार केला पाहिजे. ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे . या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही त्यामुळे उपरवाला सब देखता है',अशी प्रतिक्रिया जिंतेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
Edited By - Vishal Gagngurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.