
संजय गडदे
Mumbai Crime News - लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला. काहींचे उद्योग बुडाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. यातून काहींना नैराश्य आले तर काहीजण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाले. मुंबईच्या वाकोला परिसरातही असाच काहीसा प्रकार पुढे आला आहे.
कोरोनामुळे मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या तरुणाची नोकरी गेली आणि तो ड्रग्स पेडलर बनला. मात्र दोनच वर्षात या ड्रग्स पेडलरला मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेल कांदिवली युनिटने ताब्यात घेतले आहे.
शब्बाद खान अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 325 ग्राम इतके अमली पदार्थ जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजाराटील कीमत १.३० कोटी इतकी आहे.
मुंबईतील वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी ड्रग्स पेडलर विरोधात मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. यानुसार अँटी नार्कोटिक सेल कांदिवली युनिटने अशा अनेक ड्रग्स पेडलर विरोधात कारवाई करून त्यांना बेड्या ठोकल्या.
शुक्रवारी कांदिवली नार्कोटेक्स युनिटला गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार एक तरुण सांताक्रुज वाकोला भागात पश्चिम द्रुतगती मार्गावर हेरॉइन ड्रग्स घेऊन येणार असल्याच समजले. यानंतर अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक रूपेश नाईक व पथक हे सांताक्रुझ (पू), मुंबई (Mumbai) परिसरात सापळा लावला असता मेट्रो पोल क्र. पी. १६२, वाकोला ब्रिजच्या खाली एक संशयित इसम हातात काळ्या रंगाची प्लॅस्टिक कॅरीबॅग घेवून संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळून आले.
मात्र पोलिसांना (Police) पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे २७५ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या घरी सुद्धा काही अमले पदार्थ ठेवल्याचे त्याने कबूल केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.