Chitra Wagh : उर्फीने भाजपमध्ये प्रवेश केला तर? चित्रा वाघ संतप्त होत म्हणाल्या, "असल्या नंगट लोकांसाठी पक्ष…"

पत्रकारांशी संवाद साधत असताना एका प्रश्नावर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.
Chitra Wagh
Chitra WaghSaam TV

Chitra Wagh : भाजपनेत्या चित्रा वाघ या अद्यापही उर्फीच्या कपड्यांवर विरोध आणि टीका करत आहेत. अशात काल उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात धमकावल्याची तक्रार दाखल केली. यावर आज पत्रकारांशी संवाद साधत असताना एका प्रश्नावर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. असल्या नंगट लोकांसाठी पक्ष नाही, असे त्यांनी सांगितले आहे. (Latest Chitra Wagh News)

नेमका काय होता प्रश्न?

चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केल्यानंतर आता तिला न ओळखणारे देखील ओळखू लागलेत आणि तिचे फॉलोवर्स वाढत आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावरूनच जर उर्फीने भाजपमध्ये प्रवेश केला तर असा प्रश्न एका पत्रकाराने चित्रा वाघ यांना केला. यावर वाघ चांगल्याच संतापल्या. " असल्या नंगट लोकांसाठी भारतीय जनता पार्टी नाही. तुम्ही असं कसं काय बोलू शकता? भाजपमध्ये प्रत्येक व्यक्ती एक ध्येय घेऊन आलेली आहे. या विषयाचा असा मजाक करू नका. टीका करताना जरा भान ठेवा यात आमचा पक्ष आणि माझं कुटुंब यांवर टीका करू नका.", असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh
Chitra Wagh Live : उर्फीच्या तक्रारीनंतर चित्रा वाघ आक्रमक!; पाहा नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ

तसेच उर्फीने दाखल केलेल्या तक्रारीवर उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या की, " कोणी तक्रार केली तर मला काही फरक पडत नाही. मुळातच मी तिला कोणतीही धमकी दिलेली नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की, तिने आपल्या कामासाठी अभिनयासाठी काय छोटे कपडे घालायचे असतील ते घालावेत मात्र सर्व काही चार भिंतीच्या आत असावं."

Chitra Wagh
Chitra Wagh on Gautami Patil: 'गौतमी पाटील अश्लील डान्स करत असेल, तर...' चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

संभाजीनरमध्ये घडलेल्या घटनेवर देखील चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. " एका पोलीस अधिकाऱ्यानेच महिलेला त्रास दिला आहे. सर्वात आधी त्याला निलंबीत करावे. असे हरामखोर पोलीस दलात नको. महाराष्ट्राला अशा हरामखोरांची गरज नाही." असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com