Junnar News: प्रेमसंबंधातून विवाह नियोजित; मंडपात नवरी मुलीला आला संताप अन्‌ दोन्‍ही कुटूंब पोहचले पोलिसात

प्रेमसंबंधातून विवाह नियोजित; मंडपात नवरी मुलीला आला संताप अन्‌ दोन्‍ही कुटूंब पोहचले पोलिसात
Junnar News Love Marriage
Junnar News Love MarriageSaam tv

जुन्‍नर : लग्न सोहळ्यातुन सुखी संसाराचे स्वप्न पहाणारी दोन कुटुंब एकत्र येण्याआधीच एकमेकांवर (Junnar) भिडली. दरम्यान राजगुरुनगर पोलीस लग्न (Marriage) मंडपात वेळेत पोहचले अन्‌ मोठा अनर्थ टळला. सध्या नवरा– नवरी दोन्ही कुटुंब राजगुरूनगर पोलीस स्टेशनला दाखल आहेत. (Maharashtra News)

Junnar News Love Marriage
Jalgaon Crime News: भयंकर! मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

जुन्नर तालुक्यातील मुलगा आणि मुलगी यांचा प्रेमसंबधातुन आज विवाह सोहळा राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात संपन्न होणार होता. दरम्यान लग्न सोहळ्याच्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नसल्याने नवरी मुलगीचा रागाचा संताप झाला आणि लग्न करण्यास नकार देत हाणामारी झाली. यावेळी दोन्‍हीकडची मंडळी एकमेकांसमोर येत भिडले.

Junnar News Love Marriage
Bhusawal News: तापी नदीत पोहायला गेलेल्‍या पाच तरुणांपैकी दोघांचा मृत्यू; तिघांचा वाचला जीव

पोलिस आले अन्‌ अनर्थ टळला

यावेळी राजगुरुनगर पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र प्रेमसंबधातुन लग्नाचे स्वप्न पहाणाऱ्या नवरा नवरीचे वऱ्हाडी राजगुरुनगर पोलीस स्टेशनला दाखल झाले. मात्र अद्याप दोन्ही बाजुनी तक्रार देण्यात आलेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com