लखीमपुर हत्याकांडातील शेतकऱ्यांच्या अस्थींची पालघरमध्ये कलश यात्रा...
लखीमपुर हत्याकांडातील शेतकऱ्यांच्या अस्थींची पालघरमध्ये कलश यात्रा...रुपेश पाटील

लखीमपुर हत्याकांडातील शेतकऱ्यांच्या अस्थींची पालघरमध्ये कलश यात्रा...

लखीमपुर दुर्घटनेतील आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्यावर त्वरित कारवाई करावी, तीनही कृषी कायदे त्वरित रद्द करावे म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे.

पालघर: उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडात शहीद शेतकऱ्यांच्या अस्थींची कलश यात्रा आज पालघरमध्ये पोहोचली. या यात्रेत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विविध स्थानिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. लखीमपुर दुर्घटनेतील आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्यावर त्वरित कारवाई करावी, तीनही कृषी कायदे त्वरित रद्द करावे, तसचं दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही यात्रा काढण्यात आली. (Kalash Yatra in Palghar for the farmers who died in Lakhimpur massacre ...)

हे देखील पहा -

या यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद यांच्यासह जिल्ह्यातल्या विविध स्थानिक संघटनांनी सहभाग घेतला असून हजारो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार आरोपींना या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com