Kalyan Crime : सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या; तब्बल १४ सायकली पोलिसांनी केल्या हस्तगत

सायकल चोरीप्रकरणी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
kalyan crime news
kalyan crime news saam tv

कल्याण : कल्याण (Kalyan) शहरात सायकल चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. कल्याणकर सायकल चोरांना अक्षरश: वैतागले आहेत. शहरात सायकल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सायकल चोरीप्रकरणी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Kalyan Crime news )

सायकल चोरी प्रकरणी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी सायकल चोरीप्रकरणी तपास सुरू केला. त्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा आधार घेतला. त्या सीसीटीव्हीत एक चोरटा आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपीला कल्याण पश्चिम येथून अटक केली आहे. तसेच त्याकडून १४ सायकली असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

kalyan crime news
Mhaswad Crime | मुंबईचे सोने व्यापारी १५-२० लाखांचे दागिने घेऊन कारमधून जात होते, अचानक...

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरात महागड्या सायकली चोरीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भातील तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल होताच कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकांने सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सायकल चोरीप्रकरणी आरोपी सायड्रीक एबीनिझर याला कल्याण पश्चिम येथील गुरुदेव हॉटेल येथून ताब्यात घेतले.तसेच अधिक तपास केला असता आरोपीने सायकली चोरी केल्याचे कबूल केले.

kalyan crime news
Nagpur Crime : पैशांनी भरलेली बॅग घेऊन कारमधून जात होता व्यापारी; इतक्यात मागून दोघे आले अन्...

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १ लाख २७ हजार किंमतीच्या १४ सायकली हस्तगत केल्या आहेत. तसेच या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांचा देखील समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पुढील तपास पोलिस करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com