Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan News: क्वारंटाईन सेंटरमधून फरार आरोपी दोन वर्षानंतर अखेर जेरबंद

क्वारंटाईन सेंटरमधून फरार आरोपी दोन वर्षानंतर अखेर जेरबंद

अभिजीत देशमुख

कल्याण : दोन वर्षापूर्वी भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमधून पळून गेलेल्या एक सराईत इराणी चोरट्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी (Police) सापळा रचत बेड्या ठोकल्या. गाझी दारा इराणी जाफरी असे या आरोपीचे नाव आहे. गाझी विरोधात चार मोका अंतर्गत गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. (Maharashtra News)

Kalyan News
Nashik News: कुटूंब शोधायला गेले तर आढळली मृतावस्‍थेत; कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

दोन वर्षांपूर्वी २०२० साली इराणी वस्तीतील सराईत चोरटा गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सय्यद या सराईत चोरट्याविरोधात पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करत त्याला अटक केली होती. अटकेदरम्यान त्याला कोरोना झाल्याने भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र या क्वारंटाईन सेंटरमधील 32 व्या माळ्यावरून मागच्या बाजूला असलेल्या पाईपवरून उतरून गाझी पसार झाला होता.

दोन वर्षात केल्‍या चोरी

गेल्या दोन वर्षापासून पसार झालेल्या गाझी याने या काळात देखील चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले. धक्कादायक म्हणजे गाझी कल्याण जवळील लहुजीनगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यात गेले असता गाझीने मिरचीचा स्प्रे मारून पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या.

१२ गुन्‍हे दाखल

गाझीकडून आत्तापर्यंत तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्‍या आहेत. तसेच त्याच्याकडून मिरचीचा स्प्रे, दोन चाकू व एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आंबिवली येथील इराणी वस्तीमधील इराणी आरोपींच्या विरोधात फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. काही कुख्यात चैन स्नॅचरना पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्या रवानगी जेलमध्ये केली आहे. गाझी विरोधात खडकपाडा, कोनगाव, महात्मा फुले, मानपाडा, बदलापूर, भिवंडीमधील निजामपूर पोलीस ठाण्यात एकूण बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com