Kalyan News: रेल्वे बोगीत विसरले ४४ तोळे सोने, दीड किलो चांदीच्‍या दागिन्‍यांची बॅग; अवघ्या २४ तासात दागिने हस्तगत

रेल्वे बोगीत विसरले ४४ तोळे सोने, दीड किलो चांदीच्‍या दागिन्‍यांची बॅग; अवघ्या २४ तासात दागिने हस्तगत
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजीत देशमुख

कल्‍याण : रेल्वे प्रवासात विसरलेली ४४ तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने असलेली बॅग घेवून इसम पसार झाला होता. या इसमाला (Railway) रेल्वेच्या गुन्हे शाखा व विशेष कृती दलाच्या (Kalyan News) पथकाने २४ तासात शोधून काढले. त्याच्याजवळून २३ लाख ५५ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. (Maharashtra News)

Kalyan News
Banana Price: केळीला मिळतोय उच्‍चांकी दर; आवक कमी

हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने कल्याणपर्यंत प्रवास करत असताना एका प्रवाशाची ४४ तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने असलेली बॅग कल्याण स्टेशनला उतरताना रेल्वेत राहिली होती. कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर दागिने असलेली बॅग ट्रेनमध्ये विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Kalyan News
Jalgaon News: वीजबिल वसुलीला गेलेल्‍या कर्मचाऱ्यांना मारहाण; पिता- पुत्राला अटक

तक्रार दाखल होताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफ स्टाफचे पथकाने बॅगेचा शोध सुरू केला. कल्याण, दादर, सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. याच दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवर एक इसम तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाची बॅग घेवून जाताना आढळून आला. विशेष कृती दलाच्या पथकाने या इसमाचा शोध सुरू केला असता इसम अहमदाबाद (गुजरात) येथील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अहमदाबादमधील त्याचा ठाव ठिकाणा शोधत या इसमाला गाठले त्याच्याकडून दागिने असलेली बॅग ताब्यात घेतली. अवघ्या २४ तासात कल्याण लोहमार्ग पोलीस, रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाच्या पथकाने अथक तपास करत ही बॅग शोधून काढली. त्यांच्या कामगिरीचे आता सर्व स्तरातून कौतुक होतेय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com