Kalyan Mahavitaran News: वीजचोरी प्रकरणी १२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; शहापूर व टिटवाळा उपविभागात कारवाई

Mahavitaran News: वीजचोरी प्रकरणी १२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; शहापूर व टिटवाळा उपविभागात कारवाई
Kalyan News Mahavitaran
Kalyan News MahavitaranSaam tv

अभिजित देशमुख

कल्याण : वीजबिल थकीत ठेवून वीजचोरी करत महावितरणचे दुहेरी नुकसान करणाऱ्या शहापूर व टिटवाळा (Kalyan) उपविभागातील तब्बल १२१ जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या १२१ जणांविरोधात मुरबाड पोलीस (Police) ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. (Live Marathi News)

Kalyan News Mahavitaran
Ashish Deshmukh News : राहुल गांधींना 'ती' ऐतिहासिक चूक दुरुस्त करता आली असती, काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर आशिष देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

महावितरणच्या (Mahavitaran) पथकाने शहापूर उपविभागातील शेणवा शाखा कार्यालयांतर्गत मळेगाव, कुडशेत, कवठेवाडी, लिंगायतपाडा, किन्हवली, रणविहीर, कोठारे, जळक्याची वाडी, खंडुची वाडी, कृष्णाची वाडी, मुसई वाडी, शिंदपाडा आदी भागात थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी केली. या तपासणीत ६० जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. तर टिटवाळा उपविभागातील गोवेली शाखा कार्यालयांतर्गत म्हसकळ, घोटसर, वसंतनगर, मामनोली, रायते, म्हारळ आणि वरप परिसरातल्या तपासणीत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ३१ ग्राहकांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.

Kalyan News Mahavitaran
Jalgaon News: बनावट बियाण्याची ९५ पाकिटे जप्त; कृषी विभागाची कारवाई

खडवली शाखा कार्यालयांतर्गत गुरवली व गुरवली पाडा परिसरातील १८ ग्राहकांकडे वीजचोरी सापडली. मांडा शाखा कार्यालयांतर्गत बल्याणी, दर्गा रोड, नांदप, कोकणनगर भागात १२ जणांकडे वीजचोरी आढळली. टिटवाळा उपविभागात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या एकूण ६१ जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. वीजचोरीच्या देयकाचा विहित मुदतीत भरणा न झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार १२१ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com