Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan News: रेल्वे रुळावर गाड्या उभ्या करून घातला गोंधळ; आरपीएफ कर्मचाऱ्याला केली मारहाण

रेल्वे रुळावर गाड्या उभ्या करून घातला गोंधळ; आरपीएफ कर्मचाऱ्याला केली मारहाण

अभिजीत देशमुख

कल्‍याण : दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाब्‍लॉक दरम्यान ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फाटकात रेल्वे (Railway) रुळाचे काम सुरू होते. या दरम्यान गेटमनला जबरदस्तीने गेट उघडण्यास लावत गोंधळ घालून रेल्वे पोलीस (Railway Police) कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण केल्‍याचा प्रकार झाला. (Tajya Batmya)

Kalyan News
Manmad News: धावत्या रेल्वेत शौचालयाजवळ महिलेची प्रसुती

दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकांमधील रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच सुमारास पाच ते सात अज्ञात इसम या ठिकाणी आले. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्याचे गेटमनला सांगितले. मात्र गेटमनने दुरुस्ती सुरू असल्याने नकार दिला. त्यामुळे या पाच ते सात जणांनी रेल्वे रुळावरच ठिय्या मांडत गोंधळ घालून सुरुवात केली.

दोन तास गोंधळ

रेल्वे रुळावरच त्यांनी स्वतःच्या गाड्या देखील उभ्या केल्या. या पाच ते सात जणांची समजूत काढण्यात आलेल्या रेल्वे कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्याला देखील यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी डोंबिवली जीआरपीला रोहित विश्वकर्मा, साजन सिंग, गौरव सिंग, संतोष यादव, विल्सन डिसोझा या पाच जणांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com