Maratha Reservation: आरक्षणाला विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावू नका; कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी

Kalyan News : आरक्षणाला विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावू नका; कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोधात नाही. तर ओबीसी (OBC) संवर्गातील कुणबी यांचे आरक्षण हिरावून घेऊन ते मराठा समाजाला देण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका (Kalyan) कल्याण तालुका ओबीसी महासंघाने घेतली आहे. (Breaking Marathi News)

Maratha Reservation
Nanded Crime News: गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची झोपेतच हत्या; सैन्यदलात कार्यरत पतीचे कृत्य, आरोपी पती स्वतःच गेला पोलिसात

कल्याण ओबीसी महासंघाने सदरच्या मागणीसाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी कुणबी समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी (Maratha Aarkshan) सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदार जयराज देशमुख यांना याबाबतचे एक निवेदन सादर केले. 

Maratha Reservation
Amravati News: नवनीत राणा व रवी राणा यांची पोलीसात तक्रार; युवक काँग्रेसकडून ईडी चौकशीची मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा वेगळा विचार करुन त्यांना आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करु नये; अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच केंद्रात प्रतिनिधीत्व करणारे आमचे खासदार ओबीसी समाजाचे आहेत. राज्यात प्रतिनिधित्व करणारे आमदार ओबीसी समाजाचे आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यातून याबाबत कुणाचीही प्रतिक्रिया उमटत नसल्याची खंत देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com