Ganpat Gaikwad News : नाना पाटेकरांच्या वक्तव्याचे गणपत गायकवाडांकडून समर्थन; महापालिकेवर केला भ्रष्टाचाराचा आरोप

Kalyan News : नाना पाटेकरांच्या वक्तव्याचे गणपत गायकवाडांकडून समर्थन: उल्हासनगर महापालिका प्रशासनावर केला भ्रष्टाचाराचा आरोप
Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadSaam tv

अभिजित देशमुख 
कल्याण
: भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे; असे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले होते. या वक्तव्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी समर्थन केले आहे. तसेच त्यांनी (Ulhasnagar) उल्हासनगर महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधत टीका केली. महापालिकेत अनधिकृत बांधकाम, पाणी चोरी, मनपा क्षेत्रातील होर्डिंगच्या टॅक्स पैसे लाटणे, एकाच विकास कामांसाठी चार चार जागांचे निधी वापरणे असा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील केला. (Latest Marathi News)

Ganpat Gaikwad
Kalyan News : मुंबई पोलिसांवर हल्ला करणारा इराणी गजाआड; १० गुन्ह्यात होता फरार

भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे या या नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी समर्थन केलंय. ही बातमी दाखवल्याबद्दल त्यांनी साम टीव्हीचे आभार मानले. नाना पाटेकर यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेच्या कार्यपद्धतीला लक्ष केलंय. आमदार गायकवाड यांनी नाना पाटेकर यांनी भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे असे सांगितले ही गोष्ट खरी आहे, हाताचे पाचही बोटं सारखे नाहीत असेही ते बोलले होते. मात्र उल्हासनगर महापालिकेत सर्व अधिकारी हाताच्या पाचही बोटांसारखी आहेत. 

Ganpat Gaikwad
Soybean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात; सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव

एकाच कामासाठी चार निधी 

एकच कामासाठी आमदार निधी, खासदार निधी, महापालिकेचा निधी राज्य शासनाचा निधी असे चार निधी वापरले गेले. अनधिकृत बांधकामांचा भ्रष्टाचार, पाणी चोरून विकणे, मेन लाईन वरून अनधिकृत कनेक्शन देऊन त्यांच्याकडून पैसे वसुली करणे, महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेला होर्डिंगचे पैसे खाल्ले जातात. याबद्दल माहिती मागितली तर दिली जात नाही. नाना पाटेकर यांनी जे सांगितलं हे महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितलं. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com