KDMC News: तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार; केडीएमसी आयुक्तांची तंबी

तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार; केडीएमसी आयुक्तांची तंबी
KDMC News
KDMC NewsSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : आठवडाभरात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईचे काम पूर्ण होती. नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा तर संबंधित ठेकेदाराचे बिलं तर देणार नाही. तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केले जाईल; अशी तंबी आयुक्तांनी ठेकेदारांना दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) आयुक्तांनी कल्याण (Kalyan) डोंबिवली हद्दीतील नालेसफाईच्या कामाचे पाहणी केली. यावेळी नालासोफीची काम ही वेळेत पूर्ण करण्याचे सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. (Live Marathi News)

KDMC News
Jalna News: शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला एक किलो कापूस; चुकीच्या आयात, निर्यात धोरणाचा निषेध

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लहान मोठे असे एकूण ९२ नाले आहेत. पावसाळ्याआधी या नाल्यांची सफाई महापालिकेकडून केली जाते. यंदा देखील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाले सफाईची कामे हाती घेतली आहेत. नालेसफाईच्या कामांची आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त दांगडे यांनी नालेसफाईचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

KDMC News
Wardha News: मनसेचे मुंडण आंदोलन करत निषेध; पाच वर्षांपासून रखडले आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम

येत्या आठवड्याभरात नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात येतील. पुन्हा पुढील चार दिवसांनी मी या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत पाहणी करणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना आयुक्त दांगडे यांनी नालेसफाईच्या कामात दिरंगाई व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा आढळला, तर संबधित ठेकेदाराला बिले देणार नाही. तसेच या ठेकेदाराला कायस्वरुपी ब्लॅक लिस्ट करण्यात येईल अशी तंबी ठेकेदाराला दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com