Traffic Police Action: अवघ्या तीन तासात सव्वा चार लाखांचा दंड; वाहतुक पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

अवघ्या तीन तासात सव्वा चार लाखांचा दंड; वाहतुक पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
Traffic Police Action
Traffic Police ActionSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण शीळ रोडवर अनेकदा बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आज पलावा, बदलापूर चौक येथे वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) या रस्त्यावर विना हेल्मेट, सीटबेल्ट, सिग्नल मोडणाऱ्या, विना परवाना गाडी चालवणऱ्या व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३६७ वाहन चालकांवर दंडात्मक (Kalyan News) कारवाई केली. अवघ्या तीन तासात झालेल्‍या कारवाईत सुमारे ४ लाख १५ हजार ९०० रूपयांचा दंड करण्यात आला असून यामधील २५ हजार रुपये जागीच वसूल करण्यात आलेत. (Breaking Marathi News)

Traffic Police Action
Samruddhi Mahamarg Accident: डुलकी आली अन् झाला अपघात; चारदा पलटी होत कार दुसऱ्या साईडला, तीन जखमी

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे राहणाऱ्या नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी कल्याण शीळ रोड हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसून येते. बेशिस्त वाहन चालक या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर घालत असतात. अनेकदा या ठिकाणी अपघात देखील घडतात. या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी वाहतूक पोलीस शाखेतर्फे आज किल्ल्यांची रोडवरील तलावा व बदलापूर चौक येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आला.

Traffic Police Action
Dharashiv News: सत्ताधारी शिवसेनेचे महावितरणच्या दारात हलगी झांज वाजवत आंदोलन; डीपी देत नसल्याने आंदोलन

अवघ्या तीन तासाच्या कालावधीत विना हेल्मेट ७२, विना सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ९०, ब्लॅक फिल्म ६, ट्रिपल सीट ३, फ्रंट सीट १८, विदाऊट लायसन १३, गणवेश न घालने ११, रोड पार्किंग ७, धोकदायक वाहन चालविणे २, विरुद्ध दिशेने २, फोनवर बोलणे ४, विदाऊट हेल्मेट ९० व इतर अशा एकूण ३६७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांना एकूण ४ लाख १५ हजार ९०० दंड आकारण्यात आला असुन त्या पैकी २५ हजार ५०० दंड जागीच वसूल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com