
अभिजीत देशमुख
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील कोपर खाडीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उपसा स्थानिक ग्रामस्थांनी उघकिस आणला. रेती उपसा करणारे बाज ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडली. मात्र रात्रीच्या अंधारात बाज सोबत (Kalyan News) असलेली बोट व रेतीमाफीयानी पळ काढला. याबाबत तहसील प्रशासनाला माहिती मिळताच नायब तहसीलदारांचे पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Tajya Batmya)
डोंबिवली पूर्वेकडील कोपर खाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरी छुपे बेकायदेशीरपणे रात्रीच्या अंधारात रेती उपसा सुरू होता. त्यामुळे खाडीलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनत चालल्या होत्या. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र हे रेती माफीया रात्रीच्या अंधारातच रेती उपसा करत पळून जात होते. शनिवारी देखील रात्रीच्या अंधारात रेती माफिया कोपर खाडी किनारी रेती उपसा करत होते. याच दरम्यान ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रेतीमाफियाना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.
१५ लाखाचा मुद्देमाल नष्ट
याच दरम्यान मध्यरात्रीनंतर ओहोटी लागल्याने रेती माफियांचा बाज व बोट खाडीकिनारीच अडकली तर बाज सोबत असलेल्या बोटीमधील रेतीमाफियानी पळ काढला. आज सकाळी या घटनेबाबत तहसीलदारांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेती उपसा करणारा सेक्शन पंप, बाज कापत पेटवून दिला. तर रेतीचा साठा नष्ट केला. तहसील प्रशासनाकडून सदर रेतीची बाज, सेक्शन पंप कापून पेटवून दिला व रेतीचा साठा जप्त करत तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच संबधित रेतीमाफीयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तहसील प्रशासनाने सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.