Kalyan News : ज्यूस सेंटरवर ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाला अचानक काळाने गाठलं

Kalyan Sarpadansh: आई-वडिलाबरोबर फळ विक्री करणाऱ्या अमितने महिन्याभरापासून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यालगत स्वताचे ज्यूस सेंटर सुरु केले होते.
Kalyan Sarpadansh News
Kalyan Sarpadansh Newssaam tv

>> अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan Sarpadansh News : विषारी साप चावल्याने १५ वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील साईनगर सुदर्शननगर परिसरात घडली आहे. अमित सोनकर असे या मुलाचे नाव असून त्याने महिन्याभरापासून विठ्ठलवाडी स्थानकासमोर ज्यूस सेंटर सुरु केले होते.

याच ज्यूस सेंटरवर ग्राहकाच्या प्रतीक्षेत असलेल्या अमितला सापाने दंश केला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योग्य उपचारासाठी त्याला कळवा येथे हलवण्यात आले, परंतु तिथे पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या अमितला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाचा आवारात गोंधळ घातला.

Kalyan Sarpadansh News
Shushma Andhare News: होय... मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने जारी केला VIDEO

आई-वडिलाबरोबर फळ विक्री करणाऱ्या अमितने महिन्याभरापासून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यालगत स्वताचे ज्यूस सेंटर सुरु केले होते. काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अमित नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला असताना पायाखाली असलेल्या भाजीच्या गोणीला त्याचा पाय लागला आणि पायाला विषारी सापाने दंश केला. यानंतर त्याच्या आई वडिलासह नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.

ड्युटीवर असलेल्या डॉक्टरानी त्याला विष प्रतिबंधक औषधाचे दोन डोस देत उपचार सुरु केले. मात्र यादरम्यान विषाने त्याच्या मेंदूवर आघात केल्याने त्याची प्रकृती वेगाने बिघडू लागली. त्यातच विष रक्तात भिनलेल्या व्यक्तीवर आयसीयूमध्ये उपचार करणे गरजेचे असते, परंतु पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयूची सुविधा नसल्याने या मुलाला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णालयात पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच नागरिकांनी संताप व्यक्त करत रुक्मिणीबाई रुग्णालयाला घेराव घालत आंदोलन केले. (Breaking News)

Kalyan Sarpadansh News
Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबाबतचा निर्णय काही तासांत मागे, तहसीलदारांकडून जाहीर प्रगटण

दरम्यान याबाबत पालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा असून उपचारासाठी आलेल्या मुलावर तातडीने योग्य उपचार करण्यात आले. मात्र विषाचा अमल त्याच्या मेंदूवर होत असताना रुग्णालयात आयसीयुची सुविधा नसल्याने त्याला कळवा रुग्णालयात पाठवावे लागल्याचे सांगत उपचारात कोणतीही हलगर्जी झालेली नसल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com