स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी, क-हाड अव्वल; ७ शहारांना ३ स्टार

या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
swachh survekshan logo
swachh survekshan logo

सातारा : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण- 2021 आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणमध्ये सातारा जिल्ह्यातील क-हाड आणि पाचगणी या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 (Swachh Survekshan 2021) अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या (शनिवार, ता. २०) नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बराेबरच जिल्ह्यातील सातारा (satara), मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, क-हाड या सात शहरांना देखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे ३ स्टार रँकिंग प्राप्त झाले आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

swachh survekshan logo
DCC तील राजकारणावरुन शंभूराज देसाई नाराज; NCP ला दिला इशारा

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत क-हाड व पाचगणी शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे शंभर टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिकेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा शंभर टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर शंभर टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या.

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com