Amboli Ghat News: मृतदेह टाकण्यासाठी कराडचे दाेघे आंबाेली घाटात गेले; एकाचा दरीत पडून मृत्यू,पाेलिस चाैकशी सुरु

या घटनेमुळे सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
sindhudurg, karad
sindhudurg, karadsaam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg News : आंबाेली (Amboli) दरीत एकाचा मृतदेह टाकण्यासाठी आलेल्या कराड (Karad) येथील एकाचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला आहे. दरीत पडून मृत्यू झालेल्या त्याच्या सहका-याला पाेलिसांनी तूर्तास ताब्यात घेतले आहे. संबंधिताची चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)

sindhudurg, karad
Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

या घटनेबाबत मृत्यू झालेल्या सहका-याने पाेलिसांना आणि माध्यमांना दिलेली माहिती अशी : माझ्या कराड (karad) येथील मित्राकडून एकाने वीटभट्टी व्यवसायासाठी एकाला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला गाडीत घालून मारहाण केली.

यावेळी त्यास हदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही घाबरलाे. त्याचा मृतदेह टाकण्यासाठी आंबोली घाटात आलाे. काल (साेमवार) रात्री साधारणत: साडे सात आठ वाजता घाटात आलाे.

sindhudurg, karad
MLA Vaibhav Naik : लक्षात ठेवा... ! ACB च्या सूत्रधारांना आमदार वैभव नाईकांचा इशारा

त्याचा मृतदेह टाकताना माझ्या मित्राचा पाय घसरला आणि तो देखील मृतदेहासह दरीत पडला. मला फार भिती वाटल्याने मी गाडीत बसून राहिलाे. या घटनेची माहिती पाेलिसांना मिळताच ते देखील येथे आले. दरम्यान पाेलिसांनी दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com