नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला; नगरमधील कर्जतमध्ये कडकडीत बंद

अहमदनगरच्या कर्जत शहरात प्रतिक उर्फ सनी पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रतिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
karjat crime news
karjat crime news saam tv

कर्जत : अहमदनगरच्या कर्जत शहरात प्रतिक उर्फ सनी पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रतिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर कर्जतमध्ये सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) चार जणांना अटक केली आहे. (Karjat Crime News )

karjat crime news
Nitesh Rane : '...तर आमचे हात कोणी बांधले नाहीत'; कर्जतमधील 'त्या' प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या कर्जत शहरात प्रतिक उर्फ सनी पवार राशीन येथे थांबलेला असताना त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज , काठ्या , हॉकीची स्टिकने त्याच्यावर गंभीर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सनीवर पवारच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी अमित माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मीडियावर आय सपोर्ट नुपूर शर्मा असा स्टेटस ठेवल्याने मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आठ जणांवर अॅट्रोसिटीसह कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिकवर झालेल्या हल्ल्याचा पार्श्वभूमीवर आज कर्जत शहरात बंद पाळण्यात आला आहे.

कर्जतमधील प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

कर्जतमध्ये एका प्रतिक पवार नामक युवकाला बारा ते चौदा जणांकडून मारहाण झाली. प्रतिक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत सदर घटनेवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, 'प्रतिक पवार नावाचा एक युवक अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये जात असताना दहा ते पंधरा जणांनी थांवबलं. नुपूर शर्मा यांचा डिपी ठेवतो. हिंदू म्हणून आवाज करतो. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. सदर युवकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. त्याला ३५ टाके पडले असून युवक मृत्यूशी झुंज देत आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

karjat crime news
भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी एसआयटी करणार तपास; CM एकनाथ शिंदेंचे निर्देश

'हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. नुपूर शर्मा विषय बंद झाला आहे. पण वारंवार हल्ला होत असेल, तर आमचे हात कोणी बांधले नाहीत. कर्जत प्रकरणातील मुख्य आरोपी पकडले गेले नसून ते फरार आहेत. त्या आरोपींना पोलिसांनी अटक करावी. सदर आरोपींवर कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com