
Karjat Accident News: कर्जत तालुक्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर नवरीला मांडव परतणीसाठी नेत असताना भरधाव टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात नवरीसोबत असलेल्या करवलीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १६ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Breaking Marathi News)
वीणा मारुती निरगुडा (वय १८ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. सुदैवाने या अपघातात नवरा-नवरीला कुठलीही दुखापत झाली नाही, ते सुखरुप आहेत. कर्जत तालुक्यातील आसलवाडी गावाजवळ तीव्र चढाच्या ठिकाणी हा अपघात झाला. या घटनेनं लग्नघरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माथेरान डोंगररांगांमधील नाण्याचा माळ गावात राहणाऱ्या सांबरी कुटुंबातील मुलाचा नेरळच्या टपालवाडी गावात राहणाऱ्या भला कुटुंबातील मुलीशी सोमवारी विवाह झाला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१६ मे) नवरीला आपल्या माहेरी नेण्यासाठी नेरळ टपालवाडी येथून वऱ्हाडी मंडळी आसलवाडी येथे आली होती. (Latest Marathi News)
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समिर सांबरी यांच्यासह नाण्याचा माळ आसलवाडी येथून टपालवाडीकडे जाण्यास निघाले. साधारण ३५ जणांच्या वऱ्हाडी मंडळी यांना घेवून नेरळ आनंदवाडीकडे पीकअप टेम्पो निघाला होता. दरम्यान पिकअप आसलवाडी गाव सोडून पुढे बेकरेवाडीकडे आला असता, वाहनात जास्त प्रवासी असल्याने तेथील चढावर पिकअपची गती कमी झाली.
काही कळण्याच्या आतच पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळला. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, अपघातात टेम्पोतील वीणा मारुती निरगुडा (वय १६ वर्ष) ही मुलगी बाहेर फेकली गेली. ती टेम्पोच्या चाकाखाली अडकल्यामुळे टेम्पो जागीच थांबला. या दुर्घटनेत टेम्पोतील १६ जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीचाही समावेश आहे. सर्वांना बाहेर काढल्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत वीणाच्या आई-वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून सध्या ती भावाच्या घरी राहत होती. मात्र, या दुर्घटनेत तिचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.