कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आठवड्यात केली टोळी जेरबंद

कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आठवड्यात केली टोळी जेरबंद
कर्जत पोलिसांनी मोबाईल शॉपी फोडणाऱ्यांची टोळी शिताफीने पकडली.

अहमदनगर ः कर्जत तालुक्यातील धालवडी येथील प्रमोद पोपट चव्हाण (राहणार धालवडी तालुका कर्जत) यांची मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरीस गेले होते. कुळधरण गावात त्यांचे प्रगती मोबाईल शॉपी दुकान आहे. शटर उचकटून दुकानातून 5 लाख 20 हजार रूपये किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरून नेले.

या बाबतची फिर्याद दाखल होताच ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. तपास सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. ही मोबाईल शॉपी फोडण्याचा गुन्हा आष्टी, (जिल्हा बीड) तसेच बेनवडी (तालुका कर्जत) आणि करमाळा येथील आरोपींनी मिळून केल्याचे समजले. आता ते आरोपी चिलवडी गावचे शिवारात वीटभट्टीवर काम करीत आहेत. ही माहिती समजल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला. Karjat police nab mobile gang

कर्जत पोलिसांनी मोबाईल शॉपी फोडणाऱ्यांची टोळी शिताफीने पकडली.
ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याने पवारांनी भाजपला खिजवलं

संशयित इसम पप्पू सर्जेराव गायकवाड (वय 25 वर्ष, रा. धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड), सूरज बाळू गायकवाड, (वय 20 वर्ष, रा बेनवडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनी तपासात आणखी दोन जोडीदार असल्याचे समजले. ते खडकी (ता. करमाळा) येथील गुन्हेगार असल्याचे सांगितले. सदर माहितीवरून खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड (रा. खडकी, ता. करमाळा) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेली 4 लाख हजार 20 हजार रुपये किमतीचे एकूण 21 मोबाईल जप्त केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अंमलदार सुनील माळशिखरे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोसई भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, सुनील माळशिखरे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, अमित बर्डे, गणेश भागडे, सागर म्हेत्रे, शकील बेग, विकास चंदन, नितीन नरुटे यांनी केली.Karjat police nab mobile gang

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com