Sangali News : सांगलीवर संकट! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा; CM शिंदेंची भूमिका काय?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे
CM Eknath Shinde vs Basavaraj Bommai
CM Eknath Shinde vs Basavaraj BommaiSaam TV

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याबाबत काय भूमिका घेणार याकडेच सर्वांच लक्ष लागलंय.

CM Eknath Shinde vs Basavaraj Bommai
Municipal Corporations : महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर? नव्याने होणार प्रभाग रचना

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी गावातील कर्नाटक सीमा भागातील चाळीस गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांनी पाण्यासाठी लढा दिला अनेक बैठका झाल्या मात्र अद्यापही या गावांना पाणी मिळाले नाही. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जत ते सांगली असा पायी मोर्चा काढून आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी असा ठराव केला होता.

मात्र अद्याप पाणी मिळाले नाही. यावर मंत्रालयात बैठका ही झाल्या. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या चाळीस गावांना पाणी देण्याचे विचार करत आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारने गंभीरपणे विचार करीत आहे, असं खळबळजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde vs Basavaraj Bommai
Meerut Election : मेरठ शहराचं नाव नथुराम गोडसे नगर करणार; हिंदू महासभेची मोठी घोषणा

कर्नाटक सीमा भाग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमाच्या शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णयही कर्नाटक सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देणार. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आम्ही गोळा करीत असल्याचे कर्नाटक सरकार म्हणत आहे. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर चर्चा करण्यासाठी मुंबई प्रशासनानं तातडीचे बैठक बोलावली असल्याचेही ते म्हणाले.. महाराष्ट्रातील कन्नड यांचे रक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर नुकतीच एक बैठक झाली. सीमेवरील नागरिकांच्या पाठिशी राज्य सरकार असून कायदेशीर लढाई लढली जाईल. यातील न्यायप्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देईस या दोन मंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com