
Devendra Fadnavis On Karnataka Elections Result 2023 : 'कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही', असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात सत्ता असतानाही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''कर्नाटकमध्ये 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही, यावेळी तो ट्रेंड तोडू शकलो नाही. कर्नाटकमध्ये सरकार रिपीट होत नाही. 2018 मध्ये आम्हाला जितके मत मिळाले त्यात अर्धा टक्का मते कमी झाली आणि जागाही कमी झाल्या.''
ते म्हणाले, जेडीएसचे पाच टक्के मत कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या. (Latest Marathi News)
विरोधकांना टोला लगावत देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांना देश जिंकले, असं वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वार्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी, त्यांना शाह मोदींचा पराभव दिसतो.
''राहुल गांधी पप्पू आहे हे त्यांनी मान्य केलं''
फडणवीस म्हणाले, ''राहुल गांधी पप्पू आहे हे त्यांनी मान्य केलं. शरद पवारांना कर्नाटकमध्ये शून्य टक्के जागा नाही, मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले. आज उत्तर प्रदेश मधल्या लोकल बोडीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो असं म्हणतात.''
ते पुढे म्हणाले, '''बेगाणे की शादी में अब्दुला दिवाणा' अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुलं झाले, तर आनंद साजरा केला. या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काही परिणाम होणार नाही.''
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.