
DK Shivakumar's emotional statement: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षात आता मुख्यमंत्री पदासाठी पक्षामध्ये रस्सीखेच सुरु आहे. या शर्यतीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डी के शिवकुमार सर्वात पुढे आहे. काल दिल्ली दौरा अचानक रद्द केल्यानंतर आज डी के शिवकुमार दिल्लीला रवाना झाले आहेत. परंतु त्याआधी त्यांनी एक इमोशनल कार्ड खेळलंय.
'पक्ष हा आईसारखा असतो आणि आई मुलाची इच्छा पूर्ण करते... असे भावनिक वक्तव्य शिवकुमार यांनी केले आहे. मी पाठीमागून वार करणार नाही आणि ब्लॅकमेलही करणार नाही असेही ते म्हणाले. दरम्यान सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
सिद्धरामय्या सोमवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर आता शिवकुमार देखील दिल्लीला रावाना झाले आहेत. त्यामुळे आज तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेवादर ठरतो की हायकमांडला यातून मार्ग काढण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतात हे पाहावं लागेल.
काँग्रेस हायकमांड संभ्रमात
मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची या संभ्रमात काँग्रेस हायकमांड आहे. कारण एकीकडे पक्षाला विजय मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्ष असलेले डी के शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बचावली आहे तर दुसरीकडे सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा चांगला अनुभव आहे आणि संपूर्ण कर्नाटकावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस हायकमांडने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी बंगळुरूला निरीक्षक पाठवले आणि या दोघांना दिल्लीला बोलावले आहे. (Breaking News)
सिद्धरामय्या यांना दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कर्नाटक प्रदेशाध्यक्षांनी आधीच सिद्धरामय्या यांचे अभिनंदन केले होते. हायकमांडने दिल्लीला बोलवल्यानंतर प्रकृतीचे कारण देत शिवकुमार यांनी यांनी सोमवारी जाणं टाळं होतं. तसेच सिद्धरामय्याजी यांचे अभिनंदन, त्यांच्याकडे पुरेसे आमदार आहेत असेही ते म्हणाले होते. पक्षाची काही महत्त्वाची कामे शिल्लक आहेत, तीही करावी लागणार आहेत. त्यामुळे मी अडकलो आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. (Latest Political News)
बार्गेनिंग पावर वाढवम्यासाठी वक्तव्य
दरम्यान आज ते दिल्लाला रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी शिवकुमार म्हणाले की, पार्टी ही आईसारखी असते आणि आईच मुलाच्या इच्छा पूर्ण करते. शिके शिवकुमार यांनी पक्षाच्या निर्णयापूर्वी केलेलं हे वक्तव्य बार्गेनिंग पावर वाढवम्यासाठी केलं असल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.