Beed Breaking: करुणा शर्मांना अखेर जामीन मंजूर; पण...

करुणा शर्मांना (Karuna Sharma) अखेर जामीन मंजूर झाला आहे. करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
Beed Breaking: करुणा शर्मांना अखेर जामीन मंजूर; पण...
Beed Breaking: करुणा शर्मांना अखेर जामीन मंजूर; पण...Saam Tv

बीड: करुणा शर्मांना (Karuna Sharma) अखेर जामीन मंजूर झाला आहे. करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत परळी आणि अंबाजोगाईमध्ये येण्यास करुणा शर्मांना मज्जाव केला आहे. करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल काल राखीव ठेवण्यात आला होता. त्यावरील सुनावणी आज पार पडली आहे. प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या, करुणा शर्मांच्या कोठडीत दोन दिवसानं वाढ केली होती. शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती.

Beed Breaking: करुणा शर्मांना अखेर जामीन मंजूर; पण...
मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी महिलेने केली आत्महत्या

दरम्यान, करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून फिर्यादी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून, करुणा शर्मासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर परळी शहर पोलीस ठाण्यात, गु.र.न 142-2021 कलम 307, 323, 504, 506, 34, 3 (1)(r), 3(1), 3(2) सह ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता.

परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर, 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. शर्मा यांची ऍड.भारजकर यांनी बाजू मांडली होती तर सरकारच्या वतीने अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. दरम्यान, दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकल्यानंतर निकाल देणं मागेच अपेक्षीत होतं पण तो राखून ठेवण्यात आला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com