Nana Patole: 'पैसे वाटप आणि मारपीट करत भाजपाचा प्रचार...' पोटनिवडणूकीवरुन नाना पटोलेंची टीका

देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे, ज्याचा लोक पुढे येत आहेत आणि विरोध करत आहेत," असेही ते म्हणाले...
nana patole
nana patole saam tv

Mumbai: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. यामध्ये महागाई, बेरोजगारी, हे मुद्दे चांगलेच गाजणार आहेत. त्याआधी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर पुणे पोटनिवडणूकीच्या मुद्द्यावरुनही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News Update)

nana patole
Latur News: नाव बदलून प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले; बारा वर्षांनंतर बलात्काराची तक्रार

काय म्हणाले नाना पटोले...

यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी "राज्यातलं हे सरकार शेतकर्याला धीर देईल असं वाटलं होते. मात्र हे सरकार शेतकऱ्यांविरोधी आहे. सरकार स्वत:ची पाठ राज्यपालांच्या हातून ठोकून घेत आहे, असे म्हणत, कापूस उत्पादक, कांदा उत्पादक, तूर उत्पादक सर्वच त्रस्त आहेत. हे शेतकर्याच्या टाळू वरचं लोणी खाणारं हे ईडी सरकार आहे," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "पुणे पोटनिवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, पैसे वाटप आणि मारपिट करून भाजपने इथे प्रचार केला आहे, विरोधकांची मुस्कटदाबी सध्या सुरू असून आणि महाराष्ट्रातसुद्धा हेच सुरू आहे, असे म्हणत देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे, ज्याचा लोक पुढे येत आहेत आणि विरोध करत आहेत," असेही ते म्हणाले.

nana patole
Sanjay Raut News: आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणाची चौकशी एका दिवसात का थांबली? संजय राऊत यांचा रोख कुणाकडे?

दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सध्या सुरूवात झाली आहे. यामध्ये आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली. "मराठी भाषेचं वय अडीच हजार वर्षे आहे, मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी असून राजकारण मध्ये न आणता पाठपुरावा केला जावा," असे ते यावेळी म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com