"फडणवीस जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले, तेव्हापासून राजकारणाचा स्तर खालावला"

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी विचारले असते मिटकरी बोलत होते.
Devendra Fadnavis | Amol Mitkari 
देवेंद्र फडणवीस । अमोल मिटकरी
Devendra Fadnavis | Amol Mitkari देवेंद्र फडणवीस । अमोल मिटकरी SaamTvNews

अकोला : देवेंद्र फडणवीस जेव्हा पासून विरोधी पक्षनेते झाले तेव्हापासून राजकारणाचा स्तर जास्तच खालावलेला दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चाललंय? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आमदार मिटकरी यांना अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी विचारले असते मिटकरी बोलत होते.

हे देखील पाहा :

दरम्यान, मिटकरी म्हणाले या प्रकरणी राज ठाकरे यांनी केतकी चितळे हिला झापले असेल तर हे समर्थनीय आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सारखे मुत्सद्दी नेते यावर बोलायला तयार नसतील तर ही गंभीर बाब असल्याचे मतही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. यावेळी मिटकरी म्हणाले केतकी चितळे ही तरुणी सुरुवातीपासून वादग्रस्त राहीली आहे. सुरुवातीच्या काळात तिने महापुरुषांवर टीका केल्या आहेत.

Devendra Fadnavis | Amol Mitkari 
देवेंद्र फडणवीस । अमोल मिटकरी
उन्हाचा अतिरेक, पाणीटंचाईने लग्नांना ब्रेक!

शरद पवार यांच्या बद्दल विकृत पोस्ट तिने समाज माध्यमांवर पोस्ट केली. शरद पवार यांच्या टीका करताना तिने मर्यादा पाळायला पाहिजे. नाहीतर, तिच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. अशी मागणी ही मिटकरी यांनी केली. कारण हे बोलणं अत्यंत चुकीचे असून अशा वादग्रस्त विधानामुळे पाच सहा महिने चर्चेत राहुन आपला टीआरपी वाढवणे याच्या पलीकडे दुसरा काही उद्देश नसावा.

Devendra Fadnavis | Amol Mitkari 
देवेंद्र फडणवीस । अमोल मिटकरी
शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमाला स्वपक्षीयांचीच गैरहजरी, मात्र राष्ट्रवादीचे नेते हजर!

शेवटी महिला म्हणून आम्ही तिचा आदर करतो. मात्र तिच्या वक्तव्यचे कुणीही समर्थन करू शकत नाही. अशा प्रकारच्या टीका करणारी ही एक विकृती आहे. ही पसरविण्याचे काम कोण करते आहे. मागच्या काळात टीका होत होत्या राजकीय टीका करण्याचा एक तो स्तर होता. मात्र, तो का खालावला तर देवेंद्र फडणवीस जेव्हा पासून विरोधी पक्षनेते झाले तेव्हापासून हा स्तर जास्तच खालावलेला दिसतोय. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुत्सद्दी नेते यावर बोलायला तयार नसतील तर ही गंभीर बाब असल्याचे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com