सेवाग्राम आश्रमातील खादी अवैद्य; त्वरीत विक्री बंद करा अन्यथा...

आयोगाचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने अवैध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश
Wardha News
Wardha News Saam TV

वर्धा: वर्धेतील सेवाग्राम बापू कुटीच्या आवारात खादी ग्रामोद्योग भांडारने, ग्रामोद्योग आयोगाच्या खादी मार्क नोंदणी प्रमाणपत्र घेतले नसल्याने सदर दुकानातून अनधिकृत/अप्रमाणित खादी कापडांची बेकायदेशीर/अनधिकृत विक्री तात्काळ थांबविण्यात यावी व "खादी गाव. खादी नावाचा वापर बंद करावा अन्यथा सदर बापू कुटी आश्रम प्रतिष्ठानाच्या दुकानावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे आयोगाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे ज्या ठिकाणाहून खादीच्या प्रसाराला सुरुवात झाली त्याच ठिकाणी कायद्याचा धाक दाखवीला जात आहे तसेच ज्या महात्म्याने खादीला चालना दिली तेथीलच खादी वर प्रहार करण्याचा डाव आता खादी व ग्रामोद्योग आयोगासारख्या संस्था आता मांडताना दिसत आहे खादी चे प्रमाणपत्र नसल्याने ही खादी अवैध असल्याचे आयोगाकडून कळविण्यात आले आहे .

आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले ज्या दुकानातून खादीची विक्री केली जात आहे त्या दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र घेतले नाही मात्र ग्रामसेवाग मंडळाचे खादी ग्राम आयोगाचे  प्रमाणपत्र नोंदणी आहे ही त्याच दुकानांची घटक दुकान आहे याबाबत आज संध्याकाळी आश्रम प्रतिष्ठान ची बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे बैठकी नंतर आयोगाला पत्र दिल्या जाईल मात्र काही अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करीत कायद्याच्या रचनेनुसार कारवाई करतात...असे फोनवर म्हणाले आहेत.

Wardha News
इस्त्रो वैज्ञानिकाची पत्नीच निघाली चोर; पोलिसांनाही दिला गुंगारा

इंग्रज काळातील बाजार व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी म्हणून महात्मा गांधी यांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा नारा दिला होता घराघरात खादी तयार व्हावी तिचा वापर देखील व्हावा याशिवाय हाताला काम मिळावे यासाठी चरखा संघाची स्थापना करण्यात आली होती रचनात्मक कार्यातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला जात होता आचार्य विनोबा भावे यांनी यासाठी खादी मिशनची स्थापना केली होती गावागावात उद्योगाची निर्मिती झाली होती गांधी काळात हाताला काम मिळाले होते तीच खादी सेवाग्राम आश्रमात देखील अजूनही निर्माण होत आहे सेवाग्राम आश्रमात त्याची विक्री देखील केली जात आहे ज्या आयोगाने आपली खादी अवैध आहे असे पत्रातुन सेवाग्राम आश्रमाला सुचविले आहे त्या आयोगाच्या निर्मितीसह आयोगातील अधिकार्‍यांना देखील या खादी मुळेच रोजगार मिळाला आहे पण त्याच खादी वर खादी प्रमाणपत्र मार्क ची नोंदणी नसल्याने ती अवैध ठरविण्यात आले आहे

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या बापू कुटीच्या आवात असलेल्या "खादी ग्रामोद्योग भंडारला भारत सरकारच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या प्रतिनिधीने भेट दिली असता खादी प्रमाणपत्र / खादी मार्के प्रमाणपत्र प्राप्त न करता "खादी ग्रामोद्योग भांडार मधून अप्रमाणित खादी कापडांची बेकायदेशीर/अनधिकृत विक्री केली जात आहे.असे निदर्शनात आल्याचे आयोगा पत्रात सांगण्यात आले आहे.

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने खादी मार्क नियमन-2013 द्वारे स्पष्टपणे आदेश दिले आहेत. खादी किंवा खादी मार्क खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे प्रमाणित खादी मार्क नोंदणी असलेल्या खादी संस्था/युनिट्सद्वारेच वापरला जाईल याशिवाय, खादी प्रमाणपत्र/खादी मार्क प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय खादीच्या नावावर कपड्यांचे उत्पादन किंवा विक्री इतर कोणत्याही प्रकारच्या युनिट/व्यक्ती किंवा संस्थेद्वारे करण्यास कायद्यानुसार मनाई आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com