खामगाव शहर एम.आय.एम. अध्यक्षांचे चिखलात लोटांगण

नागरी वस्तीत सुविधांचा अभाव
खामगाव शहर एम.आय.एम. अध्यक्षांचे चिखलात लोटांगण
खामगाव शहर एम.आय.एम. अध्यक्षांचे चिखलात लोटांगणसंजय जाधव

बुलढाणा - खामगाव Khamgaon शहरात अनेक भागात मुलभुत सुविधांचा अभाव असून रस्ता, नाली व पिण्याचे पाणी अश्या अनेक समस्यांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे शासनाचे व सत्ताधारी पक्षाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एमआयएमचे MIM शहर अध्यक्ष माजी नगरसेवक आरीफ पहेलवान Arif Pehlwan यांनी अनोखे आंदोलन करीत थेट चिखलयुक्त रस्त्यावर लोटांगण घेत नगर परिषद व नगरसेवकांचा निषेध केला आहे.

हे देखील पहा -

शहरातील अनेक रस्त्यावर व गल्लीत मोठ्या प्रमाणावर चिखल साचत असून तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १५ वर्षापासून नागरीकांनी वेळावेळी शासनाला या समस्येबाबत सुचित केले होते. परंतु याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. ही समस्या त्वरीत निकाली काढावी याकरीता आरीफ पहेलवान यांनी चिखलामध्ये लोटांगण घेवून अनोखे आंदोलन केले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com