बुलढाणा : एसटी कर्मचाऱ्याने स्वत:ला संपविण्याचा केला प्रयत्न

त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती त्याच्या सहका-यांनी दिली.
बुलढाणा : एसटी कर्मचाऱ्याने स्वत:ला संपविण्याचा केला प्रयत्न
hit

बुलढाणा : खामगाव khamgoan आगारातील एसटी कर्मचाऱ्याने msrtc employee विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशाल अंबलकर असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून तो खामगाव आगारात मॅकेनिक म्हणून कामाला आहे. मंगळवारी रात्री त्याने घरी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशाल हा अविवाहित आहे. ताे आठ वर्षांपासून एसटीत कार्यरत आहे. सध्या त्याच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती त्याच्या सहका-यांनी दिली.

hit
राष्ट्रवादी कॉग्रेस की कॉग्रेस? भवितव्य भाजपाच्या हाती

संप सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी विशाल हा अस्वस्थ झाला हाेता. त्याला आपली नाेकरी राहील की जाईल अशी काळजी लागून राहिली हाेती. त्यातूनच त्याने टाेकाचे पाऊल उचलले अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी विशालच्या सहका-यांना दिली.

दरम्यान कर्मचा-यांनी टाेकाचे पाऊल उचलू नये. आम्ही त्यांच्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी आहाेत. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन एसटीच्या ज्येष्ठ कर्मचा-यांकडून केले जात आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com