कंटेनरने दुचाकीला ठाेकले; खामगावातील युवक ठार, एक गंभीर
akola accident news

कंटेनरने दुचाकीला ठाेकले; खामगावातील युवक ठार, एक गंभीर

- संजय जाधव

बुलढाणा : अकोला येथून खामगावला जाणाऱ्या एका मालवाहू कंटेनरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने खामगावातील एका युवक जागीच ठार झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक गंभीररित्या जखमी झाला असून त्यास उपचारासाठी अकाेला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (khamgoan-youth-died-in-road-accident-akola-sml80)

आज (बुधवार) सकाळी हा अपघात घडला akola accident news . या अपघातानंतर जखमीस तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले.

akola accident news
माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा

मॉन्टो कार्लो कंपनीत अभियंता असलेले मनीषसिंग हे त्यांच्या दुचाकीवरुन खामगाव येथील विजय सुनील गवळी (वय १८) या युवकासोबत कंपनीकडे जात हाेते. अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मालवाहू कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिली.

या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला विजय गवळी हा जागीच ठार झाला. दुचाकी चालक मनीषसिंग हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com