Pune : खेड पंचायत समितीत विजयही शिवसेनेचाच अन् पराभवही!

या निवडणूकीत अमर कांबळेंना राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेच्या एका गटाने विजयी केले त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे मच्छिंद्र गावडे यांना पराभव स्विकारावा लागला.
Pune : खेड पंचायत समितीत विजयही शिवसेनेचाच अन् पराभवही!
Pune : खेड पंचायत समितीत विजयही शिवसेनेचाच अन् पराभवही!रोहिदास गाडगे

खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आणि आज उपसभापती पदासाठी निवडणुक होत असताना शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या निवडणूकीत अमर कांबळेंना राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेच्या एका गटाने विजयी केले त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे मच्छिंद्र गावडे यांना पराभव स्विकारावा लागला.

हे देखील पहा :

खेड पंचायत समितीत शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1 आणि भाजप 1 असे संख्याबळ असताना शिवसेनेचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्यावर आणलेल्या अविश्वास ठरवावरून हाणामारी व गोळीबार ची घटना घडली आणि पोखरकरांना तुरुंगवासात जावे लागले. या राजकिय नाट्यानंतर स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीत बिघाडी झाली याचेच पडसाद राज्य पातळीवर पडले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खेड मध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार दिलीप मोहितेंना थेट आवाहन देत टीका केली हा राजकिय वादाचा संघर्ष आज पर्यत थांबला नाही.

Pune : खेड पंचायत समितीत विजयही शिवसेनेचाच अन् पराभवही!
Pune : कॉलेज सुरू करण्यावरुन गोंधळ; अजित पवारांच्या निर्णयाला तिलांजली! पहा Video

खेर खेड पंचायत समितीत शिवसेनेचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुण चौधरी याना संधी मिळाली आणि आज अखेर उपसभापती पदावरुन शिवसेनेचे दुस-या गटाचे उमेदवार मच्छिंद्र गावडे यांचा पराभव करत शिवसेनेचे अमर कांबळे याची वर्णी लागली. मात्र, याच निवडणूकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी शिवसेनेला विजय मिळाला असला तरी पराभवही शिवसेनेच्याच वाट्याला आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.