Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद

20 हजार रुपयांसाठी तीन तरूणांनी मिळून मोटारसायकलवरुन पाठलाग करुन विशालचा खुन केल्याची संपुर्ण धक्काकायक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद
Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैदSaam TV

नांदेड : नांदेड (Nanded) मध्ये रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील शारदा नगर परिसरातील राज रेसेडन्सी परिसरात ही घटना घडल्याने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशाल धुमाळ असं खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तीन तरूणांनी मिळून मोटारसायकलवरुन पाठलाग करुन विशालचा खुन केल्याची संपुर्ण धक्काकायक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद
धक्कादायक! दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला

20 हजारासाठी हा खुन झाल्याची प्राथकमिक माहिती असून, विशालवर खंजीरने सपासप वार केल्याने स्थानिक नागरिकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला, विशालनेही जिव वाचविण्यासाठी राज रेसेडन्सी कडे धावला मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत तो जागेवरच कोसळला आणि अतिरक्तस्त्रावामुळे विशालचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पहा -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी विशालच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशालवर हल्ला करणारे तिघांनाही पोलिसांनी 24 तासाच्या आत रात्री उशिरा अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com