भयानक! प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या; असा रचला कट

त्यातच मनीषाचे कुठेतरी अनैतिक संबंध सुरू असावेत असा संशय किशोरच्या मनात सतत येत होता.
भयानक! प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या; असा रचला कट
भयानक! प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या; असा रचला कटSaam TV

लातूर: आपल्यापेक्षा १० ते १२ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या मदतीने बायकोनेच नवऱ्याचा काटा काढल्याची घटना निलंगा (Nilanga Latur) तालुक्यातील शिवणी (कोतल) येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह उसाच्या फडात टाकून पसार झालेल्या दोघांना निलंगा पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला प्रियकर मात्र फरार होण्यात यशस्वी झाला असून निलंगा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील 40 वर्षीय किशोर विठ्ठल सुतार यांचा काही वर्षांपूर्वी मनीषा हिच्या सोबत विवाह (Marriage) झाला होता. हे दोघेही गावातच वास्तव्यास होते. मनीषा आणि किशोर यांना तीन मुले असून किशोरला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याच्या वागण्याला मनीषा वैतागलेली होती. त्यातच मनीषाचे कुठेतरी अनैतिक संबंध सुरू असावेत असा संशय किशोरच्या मनात सतत येत होता.

भयानक! प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या; असा रचला कट
'...म्हणून 23 डिसेंबरला वंचितचा मोर्चा धडकणार विधान भवनावर'

एकट्याला शक्य नव्हते म्हणून...

या सर्व प्रकाराला वैतागल्यामुळे मनीषाने गावातच वास्तव्यास असलेला 21 वर्षीय आपला प्रियकर अविनाश नवनाथ गुरने याला नवऱ्याचा काटा काढण्यास सांगितले. यासाठी लागणारा खर्चही मनीषाने अविनाशला दिला. यामुळे मनीषा आणि अविनाशने मिळून किशोरचा खून करण्याचा प्लॅन रचला. परंतु हा खून एकट्याने करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच मनीषाने यासाठी गावातीलच आणखी एकाची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार अविनाशचा गावातीलच 35 वर्षीय मित्र धनाजी सूर्यभान वाघमारे याला सोबत घेण्यात आले. अविनाश आणि धनाजी यांनी यथेच्च दारु पाजली. दारूच्या नशेत शुध्द हरपल्यानंतर या दोघांनी किशोरला गावापासून साधारण अर्धा किलोमिटर दूर असलेल्या बापूराव गंगथडे यांच्या शेतातील उसाच्या फडाजवळ नले.

असा झाला उलगडा....

रात्री साधारण ९.३० वाजेच्या सुमारास परिसर निर्मनुष्य होताच घनाजी आणि अविनाशने किशोरच्या गळ्यातील मफलरनेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या फडात टाकून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. याबाबत निलंगा पोलिसांत गुन्हा दाखल होताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी तपासाची चक्रे गतीमान करीत अवघ्या २४ तासांच्या आत मयत किशोरची पत्नी मनीषा किशोर सुतार हिला ताब्यात घेण्यात आले. त्या पाठोपाठ गावातीलच धनाजी सूर्यभान वाघमारे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर मनीषाने सदर गुन्ह्याची कबुली देत प्रियकर अविनाश गुरणे याच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणातील तिसरा आरोपी अविनाश हा सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com