Palghar Crime Video: धक्कादायक! धावत्या बसमध्ये प्रवाशाची गळा चिरुन हत्या; पालघरमधील घटनेने खळबळ

Crime In Bus Palghar News: पालघरनजीक मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील चारोटी टोलनाक्याजवळ ही भयंकर घटना उघडकीस आली.
Crime In Bus Palghar
Crime In Bus PalgharSaam TV

Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात एका धावत्या बसमध्ये प्रवाशाची गळा चिरून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हत्या झालेल्या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत. (Palghar Latest News)

Crime In Bus Palghar
Palghar Ghost Video: पालघरच्या कचेरी रोडवर भूत? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पोलिसांनी केलं 'हे' आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, ही घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बसमध्ये एका इसमाचा गळा चिरून हत्या (Killing) झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथून निघालेली ही बस राजस्थानमधील उदयपूर येथे जात होती. यावेळी पालघरनजीक (Palghar) मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील चारोटी टोलनाक्याजवळ (Charoti Toll Plaza) ही भयंकर घटना उघडकीस आली.

पाहा व्हिडिओ -

Crime In Bus Palghar
Palghar Crime Video: डहाणू रेल्वे स्थानकाबाहेर चाकू घेऊन माथेफिरुची दहशत; पोलिसांवरही केला जीवघेणा हल्ला

घोडबंदरहून बसमध्ये बसलेला एक अनोळखी प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने इतर सहप्रवासी आणि बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं. या प्रवाशाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आलं आहे. यानंतर कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रवासाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com