Breaking : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

पुन्हा हनुमान चालीसा वाचली तर याद राखा, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
Navneet rana
Navneet ranasaam tv

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसा म्हटल्यावर तुम्हाला जीवे मारण्यात येईल, तुम्हाला महाराष्ट्रात घुसून देणार नाही. पुन्हा हनुमान चालीसा (hanuman chalisa) वाचली, तर तुमची हत्या करण्यात येईल, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनकॉल करुन राणा यांना दिलीय. याप्रकरणी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस (police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Navneet rana
'OBC आरक्षण जाण्याच्या कटकारस्थानात शरद पवार', भाजप नेत्याचा गंभीर आरोप

खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीचा वाचण्याच्या आंदोलनामुळं वादात सापडल्या होत्या. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती. त्यांनंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यावर दिल्लीला गेले होते. त्याठिकाणीही त्यांनी हुनमान चालीसा वाचली होती.त्यांनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राणा दाम्पत्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, नवनीत राणा यांना आता हनुमान चालीसा वाचण्यावरुन एका अज्ञात व्यक्तीनं फोनकॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांच्या खासगी फोनवर एका अज्ञात व्यक्तीने ११ वेळा फोनकॉल करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्या व्यक्तीनं राणा यांना शिवीगाळ करुन धमक्या दिल्या. तुम्ही पुन्हा हनुमान चालीसा वाचली तर तुमची हत्या केली जाईल. तुम्हाला महाराष्ट्रात घुसून देणार नाही. तुम्ही पुन्हा हनुमान चालीसा वाचली तर तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं नवनीत राणा यांना दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com